अजित पवार यांनी अद्याप क्लिन चीट नाही

81

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक नेता लवकरच कारागृहात जाणार असल्याचा सूचक इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडून देण्यात आला होता. त्यांचा रोख अजित पवारांकडे होता. त्यातच आता अजित पवारांना मिळालेल्या क्लिनचीटबाबत मोठं वृत्त समोर आलं आहे.

अजित पवारांना देण्यात आलेली क्लिनचीट अद्याप प्रलंबित असल्याचं समोर आलं आहे. अजित पवार यांना एसीबीने सिंचन घोटाळा प्रकरणी २०१९ मध्ये क्लिनचीट दिली होती. तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांनी ही क्लिनचीट दिली होती. क्लिनचीट दिल्यानंतर नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. त्यात अजित पवार यांना व्हीआयडीसी प्रकरणात क्लिनचीट देऊन त्यात त्यांचा रोल नाही, असं म्हटलं होतं. मात्र या क्लिनचीटला नागपूर खंडपीठाने स्वीकरलेलं नाही. त्यामुळे अद्याप अजित पवार यांची क्लिनचीट न्यायालयात प्रलंबित आहे.

दरम्यान न्यायालयाने क्लिनचीट स्वीकारली नसल्याने अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये क्लिनचीट संदर्भात प्रतिज्ञापत्र देण्यात आलं होतं. मात्र ते मान्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांना केवळ तपास यंत्रणांनी क्लिनचीट दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यावर अजुनही टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे.