अजित पवार यांना जेलमध्ये जायला नको म्हणून भाजपमध्ये गेले – रोहित पवार

0
112

पुणे, दि. १९ (पीसीबी) : अजित पवार हे जेलमध्ये जायला लागू नये म्हणून भाजप सोबत गेले. अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचं घ्या त्यांच्यावर काय- काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे. त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती होती. जेलमध्ये जायला लागू नये म्हणून ते भाजपसोबत गेले असं विधान शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. ते आळंदी येथे बोलत होते.

भाजप सोबत जाण्यासाठी मलाही काही ऑफर असतील ना? असं सूचक विधान ही त्यांनी केलं. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ८४ वर्षाचे शरद पवार लढत आहेत. मग आपण पळून जाऊन कसे चालेल. मराठी माणूस हा कधी पळून जात नाही. हे आपण ऐकलं आणि पाहिलं आहे. आम्ही देखील जेलला घाबरत नाही. कारण आम्ही काही चुकीचं केलंच नाही. असं रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाचा नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला राजकीय फायदा किती ?
रोहित पवार म्हणाले, अनेक नेते भाजपासोबत गेले. अजित पवारांबाबत घ्या किंवा इतर नेते भाजपसोबत गेले त्यांच्यावर काय- काय कारवाया झाल्या आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्यांना भीती होती. जेलमध्ये जावं लागेल की काय? जेल ला जायला नको म्हणून त्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपच्या विरोधात बोलत होते. आता सत्तेत जाऊन मोदी सरकार मोठं वाटत आहे. हे नेते स्व:हितासाठी पक्ष बदलतात. असे रोहित पवार म्हणाले.