अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देतात, नाना पटोले यांचेही गाऱ्हाणे

40

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. राज्यातील राजकीया घडामोडींनी वेग आला आहे. शिंदेसोबतच्या आमदारांनी खासदार संजय राऊत त्रास देतात असा आरोप केला आहे. दरम्यान, या सद्यस्थितीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते असा खुलासा केला आहे.
शिंदेसोबत असणारे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहीत अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. अनेक आरोप पत्राद्वारे करण्यात आले.

हे पत्र व्हायरल होताच संजय राऊत यांनी पत्रकार परिषेद घेत शिवसेना मविआमधून बाहेर पडेल पण तुम्ही मुंबईत या असे आव्हान केलं.

या सर्व सद्यास्थितीवर बोलताना नाना पटोले यांनी, मविआ सरकारला कोणताही धोका नाही. विरोधी पक्षात बसायची आमची तयारी आहे. असे सांगत नाना पटोले यांनीही मविआ सरकार बरखास्त होण्याच्या वाटेवर असल्याचे संकेत दिलं.

या सर्व षडयंत्रामागे भाजप आहे. शिंदेकडे असलेले संख्याबळ केवळ दिखावा. शिंदेच्या प्रस्तावाच काय करायच तो त्यांचा अतर्गत प्रश्न असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
या आमदारच्या पत्रावर भाष्य करताना नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते. असा आरोप पटोले यांनी यावेळी केला.