अजितदादा समर्थक रूपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे, आनंद परांजपे यांना मिळणार विधान परिषदेवर संधी

0
40

मुंबई, दि. ४ (पीसीबी)- उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचं सुतोवाच करण्यात आलं होतं. अशात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून 3 नावांची सध्या चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी या नावांची शिफारस केली जाणार आहे.

विधान परिषदेसाठी ‘या’ 3 नावांची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावे दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानपरिषदेच्या या 12 जागांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाते. याच गोष्टींचा विचार करून ही संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. बँकींग क्षेत्रामध्ये सिद्धार्थ कांबळे यांचं मोठं नाव आहे. ते मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आहेत.

रूपाली चाकणकर यांचं एक प्रतिष्ठाण आहे. लवकरच या तिघांची नावे जाहीर केली