अजितदादांकडून बारामतीतील विकासकामांची पाहणी..!

0
41

दि. 15 (पीसीबी) बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.. पहाटे ६ वाजल्यापासून अजितदादांनी बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.. कन्हेरी येथील वन उद्यान, जळोची येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रकल्प मॅग्नेट, नविन व्यावसायिक संकुल आदी कामांना भेटी देत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सुचना दिल्या.. बारामतीतील प्रत्येक काम दर्जेदार व्हावं यावर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले..