अखेर भाजपचे सातारा लोकसभा उमेदवार उदयनराजेच

0
54

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पूर्वी दोन वेळा कमळ चिन्हावर उदयनराजे यांचा पराभव झाला होता. आता किमान तिसऱ्यांदा महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ते जिंकतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्याने त्यांनी दिल्लीत धाव घेतली होती. दिल्लीतील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते . उमेदवारी लांबल्याने त्यांच्या समर्थकांच्या नाराजीत भर पडली. उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती.