गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

0
214

मावळ, दि. १५ (पीसीबी) – विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ९५३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १४) दुपारी मावळ तालुक्यातील बधलवाडी गावात करण्यात आली.

प्रवीण प्रकाश बधाले (वय २८, रा. बधलवाडी, ता. मावळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दिनकर भुजबळ यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण बधाले याने विक्री करण्यासाठी गांजा आणला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण याच्या गोठ्यात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास छापा मारला. त्यामध्ये पोलिसांना ९५३ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. गांजासह मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण २८ हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.