सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन प्रकरणी तरुणास अटक

0
319

भोसरी, दि. २० (पीसीबी) – सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. १९) दुपारी पावणे तीन वाजता गायकवाड वस्ती, मोशी येथे करण्यात आली.

शोयब शालेशा मकानदार (वय २४, रा. मोशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रणधीर माने यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोयब हा गायकवाड वस्ती, मोशी येथील इंद्रायणी नदीच्या कडेला गांजा सेवन करत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करत त्याला अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.