चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात

0
197

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनंही जोरदार कंबर कसलेली आहे. आज चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात उतरणार आहे. रोहित पवार, धीरज देशमुख, इम्रान प्रतापगढी यांची आज प्रचार रॅली आहे. तसंच चिंचवडमध्ये सभासुद्धा आहे.

तिकडे अमित शाह पुण्यातही येणार असल्यानं भाजपच्या गोटात तयारीची लगबग आहे. कालच गिरीश बापट प्रचारात उतरल्यानं भाजपचं टेन्शन काहीसं कमी झालेलं आहे. जरी कसबा आणि चिंचवड या भाजपच्या जागा असल्या तरीही भाजपनं दोन्ही जागांवर आपली ताकद पणाला लावलेली आहे.