बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर कारवाई करणार का, आदित्य ठाकरे म्हणतात…

0
178

चिंचवड (पीसीबी)। शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार का, असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, जेव्हा, तेव्हा आणि जर तर याच्यावर आता जावून काही उपयोग नाही. आज मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पाठविले आहे.

प्रत्येक निवडणूक असते. तेव्हा आम्ही सर्व पक्ष एकत्र लढत असतो. सर्वांची ताकद एकत्र येवून लढतो. चिंचवडची जागा शिवसेनेने मागितली होती. पण, मिळाली नाही. याबाबत विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या जागेवर लढलो होतो. चिंचवडची जागा मिळण्याची इच्छा होती.

पण, सर्वांना एकत्र घेवून राष्ट्रवादीला जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे आणि विजय देखील तसाच होणार आहे. कुठेही, कोणीही, कितीही गैरप्रचार करण्याचा प्रयत्न केला की आमचा पाठिंबा आहे. पण, शिवसेना म्हणून आमचा कोणाला पाठिंबा, पाठबळ नाही. महाविकास आघाडी म्हणून अधिकृत उमेदवारासोबत आहोत.