शहरातील पाणीपुरवठा शनिवारी विस्कळीत राहणार

0
183

पिंपरी दि. १८ (पीसीबी) – पवना धरण येथे हायड्रो सिस्टीम नादुरुस्त झाल्याने जलसंपदा विभागाकडून धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आज (शनिवार) दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण येथील हायड्रो सिस्टीम नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी, आज (शनिवार) दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य व जपून करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.