अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची पदयात्रा

0
236

पिंपरी, दि. १५(पीसीबी) -‘ना पक्ष ना नेता , हौसला बुलंद होना चाहिये ‘असे म्हणत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण केला. त्यांनी काढलेल्या पदयात्रेस प्रतिसाद लाभला.

राहुल कलाटे हे महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक होते ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून शिट्टी या चिन्हावर निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. गेल्या दोन निवडणुकांचा अनुभव असलेल्या व मागील निवडणुकीत 1 लाख 12 हजार इतकी लक्षणीय मते मिळविलेल्या कलाटे यांनी वैयक्तिक भेटीगाठी, पदयात्रा याद्वारे अवघा चिंचवड मतदारसंघ पिंजून काढला आहे.

काल त्यांनी रावेत, किवळे ,पुनावळे या भागात पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला .रात्री काळेवाडी येथे युवा कार्यकर्त्यांशीही त्यांनी संवाद साधला. सुशिक्षित व तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा कलाटे यांना लाभत असल्याचे दिसून आले.

यावेळी कलाटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ‘ना पक्ष ना नेता, हौसला बुलंद होना चाहिये असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा मिळत असून त्यांच्या आत्मविश्वास पूर्ण लढाऊ वृत्तीमुळे ते तरुणांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे.