ठाकरे गटाच्या महिला संघटिका उर्मिला काळभोर, प्रमोद कुटे यांचा शिवसेनेत प्रवेश

0
373

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.

उर्मिला काळभोर या ठाकरे गटाच्या महिला संघटिका होत्या. काळभोर यांच्यासह ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विभागप्रमुख फारुक शेख, मंगेश कुटे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून शिवसेनेत प्रवेश केला. शहरातील शास्तीकराचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे अनधिकृत घरांचा प्रश्न सुटणार आहे. प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्या असल्याचे प्रमोद कुटे यांनी सांगितले.