दुर्दैवी! कामवरून घरी येताना महिलांना कारणे उडावले, ५ जणींचा जागीच मृत्यू

0
177

पुणे (पीसीबी)। सोमवारी रात्री पुणे-नाशिक महामार्गावर भयंकर अपघात घडला आहे. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून, 12 महिला जखमी झाल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील खरापुडी फाटा येथे ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. मिळाळेल्या माहितीनुरास, या सर्व महिला पुण्यातील खेड तालुक्यातील आहेत.

या सर्व महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात 5 महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, रात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा-ओरडा झाला, यावेळी याच परिसरातून पोलिस उपनिरीक्षक जात असताना त्यांनी पोलिस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. तसेच, या सर्व अपघातग्रस्त महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.