पिंपरी-चिंचवड दि. १७ (पीसीबी) – महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी शिवाच्या उपासनेचे महत्त्व आणि शस्त्र जाणून घ्या आणि धर्माचरण करा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे. शिवतत्त्व, अर्थात शक्ती 1 सहस्रपटींनी कार्यरत असणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री !
यंदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड, तसेच पुणे जिल्ह्यात विशेष ग्रंथ प्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहेत. भगवान शिवाची वैशिष्ट्ये, शिवाची उपासना कशी करावी, शिवपिंडीचे प्रकार, शिवाला बेल वहाण्याचे महत्त्व, रुद्राक्षाचे महत्त्व, शिवाच्या नावांचा आध्यात्मिक अर्थ तसेच शिवोपासना नेमकी कशी करायची याची माहिती देणारे साहित्य उपलब्ध असणार आहे. या दृष्टीने ‘आपल्या शहरातील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शन कक्षांना भेट देऊन शिव देवतेविषयी धर्मशास्त्रीय माहिती घेऊन शिवतत्त्वाचा लाभ करून घ्या,’ असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड येथे पुढील ठिकाणी लागणार ग्रंथ कक्ष !
पिंपरी-चिंचवड येथे एकूण 24 ठिकाणी हे ग्रंथ कक्ष लावण्यात येणार आहेत. त्यापैकी प्रमुख ठिकाणचे कक्ष खालीलप्रमाणे:
1. शिवशंभो फाऊंडेशन, शाहूनगर, चिंचवड वेळ – सकाळी 7 ते रात्री 10
2. निलकंठेश्वर मंदिर, कुबेरा संकुलासमोर, गाडीतळ, हडपसर, पुणे वेळ – सकाळी 9 ते रात्री 9
3. श्री तपनेश्वर महादेव मंदिर, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे वेळ – स. 8 ते रात्री 8
4. शिव-दत्त मंदिर, मासुळकर कॉलनी, पिंपरी -चिंचवड वेळ – सकाळी 9 ते रात्री 9
5. सूर्य महादेव मंदिर,पिंपळे गुरव शास्त्री नगर कासारवाडी वेळ – सकाळी 9 ते रात्री 9
6. महादेव मंदिर, स्वामी समर्थ शाळेजवळ, इंद्रायणी नगर भोसरी. वेळ – सकाळी 7 ते रात्री 9
7. धनेश्वर मंदिर, चिंचवडगाव वेळ – सकाळी 7 ते रात्री 9
8. सिद्धेश्वर मंदिर यशवंत नगर, तळेगाव दाभाडे पाण्याच्या टाकीजवळ वेळ – सकाळी 8.30 ते सायं.8.30
9. श्री गजानन महाराज मंदिर, न्यू आनंद नगर, तळेगाव दाभाडे वेळ – सकाळी 10 ते रात्री 8.30
10. सिध्देश्वर मंदिर,राजगुरूनगर वेळ – सकाळी 9 ते रात्री 8
11. श्रीवटेश्वर मंदिर, नारायणपूर रोड, सासवड, पुरंदर, पुणे. वेळ – स. 6.30 ते रात्री 9
12. महादेव आणि मित्र मंडळ जुनी सांगवी वेळ – सकाळी 6 ते रात्री 10
13. श्री म्हातोबा मंदिर, वाकड वेळ – सकाळी 9 ते रात्री 7
सर्वसमावेशक ग्रंथ आणि साधनेला साहाय्यकारक सात्त्विक उत्पादने एकत्रित उपलब्ध !
या कक्षावर अध्यात्मविषयक ग्रंथांसह राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार, आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदाही उपलब्ध असेल. ही अनमोल ग्रंथसंपदा जिज्ञासूंना ज्ञानार्जनासह साधनेसाठी मार्गदर्शन करणारी आहे. यासह गोमूत्र अर्क, जपमाळ, सात्त्विक अगरबत्ती, भीमसेनी कापूर, सात्त्विक अत्तर आदी पूजोपयोगी सात्त्विक उत्पादनेही प्रदर्शन कक्षांवर मिळतील. यासंदर्भात अधिक माहितीसाठी (70387 13883) या क्रमांकावर संपर्क करावा.