सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्या प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

0
303

किवळे, दि. १५ (पीसीबी) – सार्वजनिक ठिकाणी थांबून लैंगिक हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १४) सायंकाळी पाच वाजता देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे करण्यात आली.

विकास घोरपडे यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी समजपत्र देत त्यांना सोडून दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड-कात्रज बाह्यवळ मार्गावर किवळे येथे एका लॉज समोर रस्त्यावर थांबून दोन महिला वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करीत होत्या. त्या महिलांनी सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.