दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

0
314

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना भरधाव वेगाने जाणाऱ्या दु उन बासऱ्या दुचाकीने धडक दिली. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना चार फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे घडली.

बलवीर मांगीलाल सोलंकी (वय २८, रा. हिंजवडी फेज तीन), गंजेंद्र मांगीलाल सोलंकी अशी जखमींची नावे आहेत. बलवीर यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एचएच १२/जेई ६५३५ क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलवीर आणि त्यांचा लहान भाऊ गजेंद्र हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून हिंजवडी फेज तीन येथून जात होते. एका ठिकाणी वळण घेत असताना आरोपी त्यांच्या दुचाकीवरून भरधाव वेगात आले. त्यांनी बलवीर यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात बलवीर आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.