शहरातील 6679 खड्डे बुजविण्यासाठी सव्वा दोन कोटीचा खर्च

0
203

पिंपरी दि. १५ (पीसीबी) – शहरातील विविध भागातील रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले 6 हजार 679 खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने सव्वा दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

महापालिकेने आवश्‍यकतेनुसार डांबर, कोल्ड मिक्‍सने खड्डे भरले आहेत. इतर ठिकाणी मुरूम, खडी तसेच कॉंक्रिट करून खड्डे बुजविले. 1 जून ते डिसेंबर 2022 अखेर शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत रस्त्यांवर 6 हजार 679 खड्डे पडले होते. वास्तविकता रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून मोफत खड्डे बुजवून घेणे अपेक्षित आहे. मात्र, असे असताना महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी सव्वा दोन कोटी रूपयांची उधळपट्टी केली आहे.

प्रभागनिहाय बुजविलेले खड्यांची आकडेवारी अ प्रभाग-432, ब -824, क -1443, ड-1320, इ-510, फ-1011, ग-828, ह-311, प्रकल्प-192 असे एकूण 6679 खड्डे बुजविल्याचा दावा पालिकेने केला आहे.