कसब्यातून टिळक कुटुंब बाहेर, रासने, घाटे, बीडकर आघाडीवर

0
332

पुणे, दि. ३ (पीसीबी) – कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

सुरुवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होती. पण शहर भाजपने प्रदेश भाजपकडे पाच नावं पाठवली आहेत. त्यात टिळक पितापुत्रांसह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते धीरज घाटे, गणेश बीडकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत उमेदवाराची घोषणा अपेक्षित असतानाच भाजपने कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची खेळी खेळली. त्यामुळे टिळक कुटुंबीयांची कसब्याच्या उमेदवारीवरील दावेदारी संपुष्टात आल्याची चर्चा आहे.