आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही, शंकरशेठ मला मुलांना माझ्या मुलासारखे….. अश्विनी लक्ष्मण जगताप भाजप उमेदवार

0
421

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) : भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या विधानसभा पोट निवडणूक उमेदवारीवरून आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही, माझा दीर शंकर शेठ हा मला मुलासारखा आहे. : निवडणुकीत जगताप कुटुंबीयांचा खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी जगताप कुटुंबीयात अंतर्गत वाद असल्याच्या वावठळ अफवा उडविल्या अस स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाच्या चिंचवड विधानसभा क्षेत्रातील उमेदवार अश्विनी जगताप यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाकडून अश्विनी जगताप यांचं पोट निवडणूक उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप या पहिल्यांदाच माध्यमांचा समोर आल्या. मी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जाणार, मला देखील निवडणूक काम करण्याचं तीस वर्षाचा अनुभव आहे. निवडणुकीत मी पण पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर आणि राहटणी हा भाग पिंजून काढीन त्यामुळे या निवडणुकीत माझा निश्चितच विजय होईल….. असा विश्वास देखील अश्विनी जगताप यांनी बोलून दाखविला.