…तर आज पिंपरी चिंचवडचा महापौर राष्ट्रवादीचा असता

0
469

पुणे, दि. ३ (पीसीबी) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या आहेत. यामध्ये मुंबईसह पुणे महापालिका निवडणुकीचा देखील समावेश आहे. पुण्यात तर प्रभाग रचनेवरून अनेक घडामोडी घडल्या. त्यातच पुण्यातील दोन मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मोठ विधान केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जो कुणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. तसेच दोन्ही ठिकाणी निवडणूक होणार असून मी माझे पत्ते बाहेर काढणार नाही. मी माझ्या पद्धतीने काम कऱणार असल्याचं अजित दादा म्हणाले.

मी सत्तेत असताना प्रत्येक प्रकल्पाकडे जातीने लक्ष द्यायचो….पाठपुरावा करायचो… तेव्हाच कामं उकरतात…पुणे मेट्रोचं काम देखील त्याकाळात वेगानं झालं. विकास कामे तडीस नेण्यासाठी पाठपुरावा हा करावाच लागतो. प्रत्येक कामावर माझं बारकाईने लक्ष असतं. आताचे कारभारी किती बैठका घेतात ते आता तुम्हीच बघा, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

2017 ला पिंपरीत माझा पराभव झाला याची खंत आजही आहे. माझेच सहकारी तिकडे गेले… म्हणून हे सगळं घडलं होतं. हिंजवडीतल्या आयटी वोटरनं मोदी प्रेमात भाजपला निवडून दिलं… त्या लोकांनी कमळ निवडून आणलं म्हणून पीसीएमसीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. तसंच त्यावेळी भाजपने प्रभाग फोडले होते… मी पण यावेळी तसंच केलं होतं, पण सत्ताबदल झाला आणि निवडणूक लांबली…नाहीतर यावेळी पिंपरीत राष्ट्रवादीचाच महापौर दिसला असता, असा अजित पवार म्हणाले.

सत्यजीतला उमेदवारी द्या असं स्वत: पवार साहेबांनी मल्लिकार्जून खरगेंना फोन करून सांगितलं होतं, पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली. असो आताही काँग्रेसनं फार ताणून धरू नये, आणि सत्यजीतला पुन्हा सोबत घ्यावं असं मला वाटतं, पण अंतिम निर्णय हा सत्यजीतनेच घ्यायचा आहे.