उघड्या दरवाजावाटे ७० हजारांची चोरी

0
372

निगडी, दि. १५ (पीसीबी) – खोलीच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी खोलीतून दागिने आणि रोख रक्कम असा ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी सात ते साडेसात वाजताच्या कालावधीत गंगानगर, आकुर्डी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या खोलीचा दरवाजा मंगळवारी सकाळी उघडा होता. सकाळी सात ते साडेसात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे खोलीत प्रवेश केला. खोलीतून ६४ हजारांचे १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सहा हजार रुपये असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.