लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला लुटले

0
393

चिंचवड, दि.८(पीसीबी) – दोघांनी रात्रीच्या वेळी एका व्यक्तींना लिफ्ट दिली. काही अंतर नेऊन दोघांनी लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला लुटले. ही घटना मंगळवारी (दि. ७) चिंचवड येथे घडली.

प्रथमेश मनोरंजन जोशी (वय ३२, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोशी हे मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास महावीर चौकाकडून कामिनी हॉटेलच्या दिशेने पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना त्यांनी लिफ्ट मागितली. दुचाकीवरील दोघांनी जोशी यांना लिफ्ट दिली. पुढे काही अंतर गेल्यानंतर जोशी यांच्याकडील चार हजारांचा मोबाईल फोन आणि दहा हजार रुपये रोख रक्कम काढून घेतले. दरम्यान जोशी आणि आरोपी यांच्यात झटापट झाली. त्यात जोशी यांना मार लागला आहे चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.