माथाडी कामगाराला धमकावून लुटले

0
277

वाकड, दि. १३ (पीसीबी) – माथाडी कामगारांना माल उचलण्यासाठी प्रतिबंध करत एका कामगाराच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेत धमकावले. ही घटना ३१ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता फिनिक्स मॉल, वाकड येथे घडली.

भारत सुनील काशीद (वय २२, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज पवार आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत काशीद आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी काशीद यांचा माथाडी कामगार सुरेश कुसाळकर यांना गाडी खाली करायला किती पैसे घेतले, अशी विचारणा केली. त्यावर कुसाळकर यांनी, मी पैसे घेतले नसून आम्हाला माथाडी कामगार बोर्डातून पैसे मिळतात, असे सांगितले. त्यावरून पवार आणि साथीदारांनी कुसाळकर यांना माल उचलण्यासाठी प्रतिबंध केला. कुसाळकर यांच्या पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेत त्यांना मारहाण करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.