कोयता गँगची दहशत अद्याप कायम, कोयत्याचा धाक दाखवून एकाला लुटले

0
288

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस सध्या कोयता गँगचा बंदोबस्तासाठी विविध उपाय करत आहेत पण कोयता गँगची डोकेदुकी काही थांबण्याचे नाव घेत नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातही कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणे आता काही नवीन राहिले नाही. भोसरी एमआयडिसी येथे शुक्रवारी (दि.10) रात्री ही एका पायी जाणाऱ्या एकाला कोयत्याचा धाक दाखवून दोघांनी लुटले आहे.

याप्रकरणी हेम नारायण मनधर (वय 39 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञाता विरोधात भोसरी एमआयडिसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून हाताने व कोयत्याचा उलट्या बाजूने मारहाण करून जखमी केले, व फिर्यादीच्या जवळील फोन व रोख रक्कम असा एकूण 20 हजार रुपयांचा एवज हिसकावून घेतला. यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.