सरबत विक्रेत्यास मारहाण करून केले बेशुद्ध

0
195

देहूरोड, दि. १५ (पीसीबी) – तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बर्फ खाण्यासाठी सरबतच्या गाड्यावर गेला. तिथून बर्फ घेऊन जात असताना त्याने अचानक स्टीलच्या डब्याने सरबत विक्रेत्यास मारून बेशुद्ध केले. ही घटना देहूगाव पोलीस चौकीच्या शेजारी सोमवारी (दि. १३) दुपारी चार वाजता घडली.

संदीपान बापूराव एडके (वय ६९, रा. देहूगाव, ता. हवेली) असे जखमी सरबत विक्रेत्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुबोध राधाकिसन प्रधान (वय २२, रा. चांगतपुरी, ता. परतूर, जि. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एडके हे देहूगाव पोलीस चौकीच्या बाजूला सरबतची हातगाडी चालवतात. सोमवारी दुपारी चार वाजता सुबोध त्याच्या मैत्रिणीसोबत बर्फ खाण्यासाठी एडके यांच्या हाथगाडीवर आला. त्याने बर्फ घेतला आणि मैत्रिणीसोबत परत निघू लागला. काही अंतर जाऊन तो परत आला आणि हातातील स्टीलच्या टिफिन डब्याने एडके यांना डोळ्याखाली मारून जखमी केले. त्यात एडके बेशुद्ध पडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.