नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे …

0
227

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच आनंतर आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोश्यारी यांच्या जागी रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यात नवीन राज्यपालांच्या नावाची घोषणा होताच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयातअसे ट्विट त्यांनी केलं आहे. तसेच जयंत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो! असेही म्हटले आहे.