राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

0
380

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) : पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे येथील मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप आणि महाविकास आघाडीकडून आता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारक नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारकांमध्ये एकूण २१ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार वंदना चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख विद्या चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्षा जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार सुनील शेळके, आमदार निलेश लंके, पक्षाचे पदाधिकारी शेख सुभान अली हे स्टार प्रचारक आहेत.

यात विशेष म्हणजे स्टार प्रचारक यादीमध्ये अमोल कोल्हे यांचा ही समावेश केला गेला आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले होते. यामुळे कोल्हे हे पक्षावर नाराज असल्याबाबत चर्चा घडून येत होती.मागील काही दिवसात कोल्हें पक्षावर नाराज असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. मात्र आता त्यांचा पक्षाच्या स्टार प्रचारकांध्ये समावेश झाल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याचे बोलेले जात आहे.