सिंहगड, दि. ८ (पीसीबी) – नरवीर तानाजी मालुसरे बलिदान दिनी अभिवादन करत किल्ले सिहगड स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी सोमवारी ” नातं विश्वासाचे ” आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग व रिसर्च च्या विद्यार्थ्यांनी सिंहगडवर स्वच्छता अभियान राबवत किल्ल्यावर स्वच्छता केली व ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपण्याची विनंती पर्यटकांना केली.
तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग व रिसर्च चा क्लब ” नातं विश्वासाचे ” यांनी सामाजिक व ऐतिहासिक भान जपत शनिवारी सिंहगडावर जागोजागी स्वच्छता राखण्यासाठी संवाद साधत जनजागृती केली.
नियमित गडावर पर्यटकांची वर्दळ असल्याने अनेक ठिकाणी,दरीत प्लास्टिक व कचरा दिसून येतो , तसेच लोक पिकनिक स्पॉट म्हणून भेट देतात त्यामुळे काही पर्यटक धिंगाणा घालताना दिसून येतात . ह्या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी ” नातं विश्वासाचे ” या शिवप्रेमी समूहाने जनसंवाद साधत त्यांना इतिहासची , तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली व गडावर स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती देखील केली ; तसेच छोटीशी स्वच्छता मोहीम राबवत ट्रेकिंग च्या वाटेतील सर्व प्लास्टिक व कचरा गोळा करून पायथ्याला सर्व कचरा जमा केला.
” सरकार , वनविभाग, इतिहास प्रेमी संघटना किल्ले स्वच्छ व उत्तम ठेवण्यात पूर्ण प्रयत्न करते , पण त्या सोबत किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला जाण असावी की ही जागा थोर लोकांचं रक्त सांडून पावन झालेली आहे त्यावर आपले चिन्ह आणि कचरा करून त्याला दूषित करू नये आणि त्याचा गौरव सदैव अमर ठेवनं आपली जबाबदारी आहे….” – शिवराज नलावडे (संस्थापक – नातं विश्वासाचे))
या स्वच्छता मोहिमेत “नातं विश्वासाचे” क्लबचे शिवराज नलावडे (संस्थापक) , आदेश खेडेकर , गौरी आल्हाट ,पवन पाटील, साक्षी सुतार , संकेत दळवी , प्रीती शेवाळे , वैभव शित्रे , प्रज्वल जोगदंड , सायली गावडे व अन्य विद्यार्थ्यांचा सहभाग होता.