भयंकर… टिकावाने घाव घालत पती-पत्नीचा खून

0
332

दापोडी, दि. १२ (पीसीबी) – पती-पत्नीला टिकावाने घाव घालत ठार मारल्याची घटना दापोडी गावात घडली. शनिवारी (दि. ११) रात्री उशिरा एक जण रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्याने फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

शंकर नारायण काटे (वय ६०), संगीता शंकर काटे (वय ५५) अशी खून झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. प्रमोद त्र्यंबक मंगरुळकर (वय ४५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा दापोडी गावात प्रमोद हा रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्याने फिरत होता. हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रमोद याला थांबवून ठेवले आणि तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर प्रमोद याने दोघांना टिकावाने घाव घालून मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शंकर आणि संगीता हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.