शरद पवारांचे निकटवर्तीय बिल्डरवर आयकराचे छापे

0
212

पुणे, दि १५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे. आता या धाडसत्रातून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल.

अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज आयकर विभागाकडून पुण्यात छापे टाकण्यात आले आहेत.

मुळशी तालुक्यातील सुमारे १० हजार एकरावर वसलेल्या लवासा लेक सिटी कॉरपोरेशन मध्येसुध्दा अनिरुध्द देशपांडे हेच मुख्य होते. हडपसर येथील अमनोरा सिटी या भव्यदिव्य प्रकल्पाचे काम देशपांडे यांच्याच संकल्पनेतून झाले आहे.