राष्ट्रवादीसाठी खुद्द शरद पवार चिंचवडच्या मैदानात

0
330

पुणे, दि. १७ (पीसीबी) – कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता शरद पवारही उतरणार आहेत. २२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ते चिंचवड येथे प्रचार करणार आहेत. तर त्याच दिवशी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत शरद पवार कसब्यामध्ये प्रचार करणारेत. त्याचसोबत, कसबा आणि चिंचवडमध्ये सात ते आठ छोटे मेळावेही ते घेणार आहेत. दरम्यान, काही लोक म्हणाले, कसबा, चिंचवडला चक्कर मारून जा, म्हणन जातोय, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केलीय.

दरम्यान, पवार यांच्या प्रमाणे भाजपनेही अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप ने्त्या पंकजा मुंडे यांच्यासह मोठी फौज तैनात केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील असे बडे नेते चिंचवडसाठी शेवटचे तीन दिवस तळ ठोकून बसणार आहेत, असे सांगितले.