निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलिसांचे पथसंचलन

0
274

सांंगवी, दि. १५ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी मंगळवारी (दि. १४) सकाळी दहा ते दुपारी बारा वाजताच्या कालावधीत पथसंचलन करण्यात आले.

महादेव मंदिर, पिंपळे सौदागर गावठाण, काटे पेट्रोल पंप, स्वराज गार्डन चौक, सुदर्शन चौक, जगताप पेट्रोल पंप, वैदु वस्ती, डायनासोर गार्डन, शेल पेट्रोल पंप, काशी विश्वेश्वर चौक, काटेपुरम चौक, कृष्णा चौक, साई चौक, सांगवी पोलीस स्टेशन या मार्गावरून हे पथसंचलन झाले.

पथसंचलनात आरपीएसएफ मधील तीन अधिकारी, ७५ जवान, सांगवी पोलीस स्टेशनचे दोन पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक आणि ४० जवान सहभागी झाले.