मेदनकरवाडीत रथ सप्तमी परंपरेने साजरी

0
280

आळंदी, दि. २९ (पीसीबी): मेदनकरवाडी येथील श्री खंडोबा देवस्थान श्रींचे मंदिरात रथ सप्तमी परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि रथसप्तमी निमित्ताने श्री खंडोबा महाराज यांचा पुष्प सजावटीने सजलेला वैभवी मानाचा गाडा पुजन उत्साहात भंडार वाहत पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली. रांगा लावून श्रींचे तसेच मानाचा गाडा दर्शन घेतले. यावेळी हजारो भाविकांनी रांगेत दर्शन घेत रथ सप्तमी साजरी केली. मेदनकरवाडी श्री खंडोबा महाराज यांचे सेवेकरी म्हणून चऱ्होली, कुरूळी आणि चाकण या परिसरातून मानकरी येत असतात. येथील लोकांचा मान असतो. पहाटे पाच वाजल्या पासून ते संध्याकाळी श्री खंडोबा महाराज यांची पुजा व देवाची पदे रथ सप्तमी दिनी गायली गेली. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ यांनी दिली आहे.

श्री खंडोबा महाराज मंदिराचे सेवेकरी अरूण तोडकर आणि गावातील लहान, थोर मंडळी रथसप्तमी ते माघ पौर्णिमा पर्यंत देवाची परंपरेने पूजा करतात. रथसप्तमी दिनी श्रींची पूजा, आरती झाल्या नंतर भाविकांना अन्नदान महाप्रसादचे वाटप करण्यात आले. श्री खंडोबा महाराज यांचा मनाचा गाडा रथसप्तमी दिनी परंपरेने पुजन करण्यात आले.

रथसप्तमी ते माघ पौर्णिमा या नऊ दिवसांमध्ये गाड्या ला भाविक पाणी घालण्याची परंपरा कायम आहे. मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान राज्यात सर्व परिचित प्रसिद्ध श्रीक्षेत्र आहे. मेदनकरवाडीत श्री खंडोबा मंदिरा समोर रथ सप्तमी निमित्त बैल गाडा पूजन तसेच भाविकांनी दर्शनास गर्दी करून प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे दर्शन घेतले.