कसब्यात रविंद्र धंगेकर महाआघाडीचे अधिकृत उमेदवार

0
332

पुणे, दि. ६ (पीसीबी) – काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांना अभिवादन करण्यासाठी ते केसरीवाड्यात गेले होते. भाजपने टिळक परिवाराला उमेदवारी नाकारल्यानंतर धंगेकर टिळकांच्या भेटीला गेले आहेत. धंगेकर यांनी घेतली रोहित टिळक यांची देखील भेट घेतली आहे.

तर काँग्रेसकडून कसब्याचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी यावेळी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी, मतदार, कार्यकर्ते यांच्या जिवावर कसबा विधानसभा पोटनिवणडूक आम्हीच जिंकणार आणि त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवणार असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसकडून धंगेकर रिंगणात उतरल्याने कसब्याची ही निवडणूक अधिक रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.रासने अकरा वाजता अर्ज भरणार आहेत.