स्वछतादूत यशवंत कण्हेरे यांना पंढरी रत्न पुरस्कार

0
181

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – महात्मा फुले नगर,चिंचवड येथील जेष्ठ नागरिक स्वछता चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते जेष्ठ नागरिक यशवंत कण्हेरे यांना चिंचवड येथे ‘पंढरी रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
चैतन्य सभागृह चिंचवड येथे शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य पाचवा वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवस्वराज्य पंढरी रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला.त्यात महाराष्ट्रातील अन्य मान्यवरांबरोबर पिंपरी चिंचवड येथील मग यशवंत कण्हेरे यांना 2022 23 चा शिव स्वराज्य पंढरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कारात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष लखोजी राजे जाधव व स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ माता यांचे चौदावे वंशज माननीय राजे विजयसिंह राजे जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक महेश डोंगरे पाटील तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेस आहे कामगार नेते कैलास कदम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.