26 रोजी EVM चे बटन इतके दाबा की 440 व्होल्टचा करंट अजित पवारांना बसला पाहिजे आणि पुन्हा चिचवडचे नाव घेता कामा नये

0
195

चिंचवड, दि.१७ (पीसीबी) – चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथील सभेत बोलताना अजित पवारांवर निशाणा साधला. 26 रोजी EVM चे बटन इतके दाबा की 440 व्होल्टचा करंट राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणवतो आणि अजित पवारांनी पुन्हा चिचवडचे नाव घेऊ नये.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिवसभर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. सकाळी सुरू झालेली बैठकांची फेरी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी रात्री उशिरा झालेल्या सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर निशाणा साधत भाजप कार्यकर्त्यांची फुलचार्ज केली.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अश्विनी जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्यांनी अश्विनी यांच्या नावासमोरील कमळाचे बटण दाबा म्हणजे राष्ट्रवादीला ४४० व्होल्टचा करंट मिळेल. करंट देण्याची ताकद भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. हा करंट का द्यायचा? कारण लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या आमदाराच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीत उभ्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्यांची माणुसकी उरली नाही. निवडणूक बिनविरोध करून त्यांना आपला मोठेपणा दाखवता आला असता, पण दीड वर्षांसाठी सर्वसामान्यांच्या डोक्यावर निवडणुका लादल्या. अश्विनी जगताप यांना ऐतिहासिक मतांनी निवडून देऊन कार्यकर्त्यांनी स्व.लक्ष्मण जगताप यांना खरी श्रद्धांजली वाहिली पाहिजे. असे आवाहन बावनकुळे यांनी केले.