MVA च्या अजगराच्या विळख्यात शिवसेना – एकनाथ शिंदे

0
378

गुवाहाटी, दि. २६ (पीसीबी)- :मागील चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या गोंधळामुळे टीकेचे धनी ठरलेले एकनाथ शिंदे यांनी काल रात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे. “मला शिवसेनेला एमव्हीए सरकारच्या तावडीतून सोडवायचे आहे आणि मी त्यासाठी संघर्ष करत आहे.मला समजून घ्या.”असे आवाहन शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून केले आहे.

शिवसैनिकांमध्ये शिंदे गट विरुद्ध रोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हे आवाहन केले आहे.
“प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित…. आपला एकनाथ संभाजी शिंदे. “असे ट्विट शिंदे यांनी केले आहे.