बांधकाम साहित्य न घेतल्याने खुनी हल्ला

0
238

चाकण, दि. ४ (पीसीबी) – आमच्याकडून बांधकाम साहित्य का घेतले नाही, असे म्हणत एका टोळक्याने दोघांवर खुनी हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील भोसे गावात गुरुवारी (दि. 2) सायंकाळी घडली.

याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 3) फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदु सखाराम लोणारी, सखाराम विठ्ठल लोणारी, संतोष महादु गाडेकर यांना अटक केली असून बबलु उर्फ चंद्रशेखर सखाराम लोणारी, कृष्णा खंडू अरगडे व इतर अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आमच्याकडून बांधकामाचे साहित्य का घेतले नाही याचा राग मनात धरून फिर्यादी यांचे दिर नवनाथ किसन गाडेकर यांना शेतातून उस वाहतूक करत असताना अडवले. इथून वाहतूक करायची नाही म्हणत दगडाने, लोखंडी रॉडने, काठीने मारहाण केली. तसेच कोयत्या सारख्या हत्याराने फिर्यादी यांचे चुलत सासरे तुळशीराम यांच्या डोक्यात वार करत आज कोणालाच जिवंत सोडायचे नाही म्हणत गंभीर जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.