क्रिकेट मैदानाचे कोट्यवधींचे नुकसान करत मुळशी पॅटर्नची धमकी

0
186

हिंजवडी, दि. १२ (पीसीबी) – अकरा जणांनी मिळून माण येथील खासगी क्रिकेटच्या मैदानात जाऊन तोडफोड करत तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान केले. त्यांनतर मैदान मालकास मारहाण करून मुळशी पॅटर्न प्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ७ जून २०१९ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडली.

विकास अण्णासाहेब एकशिंगे (वय ४५, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रभाकर दगडू बोडके, संताजी दगडू बोडके, राजाराम दगडू बोडके, प्रवीण अरूण बोडके, सिताराम सोपान बोडके, हरिश भगवान बोडके, निलेश भगवान बोडके, निखील पांडे, निखील राजाराम बोडके, आनंद प्रभाकर बोडके, एक महिला (सर्व रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एकशिंगे यांनी बोडकेवाडी माण येथे पाच एकर क्षेत्रात उच्च प्रतिच्या ग्रासमध्ये क्रिकेटचे मैदान बनवले आहे. त्या मैदानात बेकायदेशीरपणे आलेल्या अकरा जणांनी संगनमत करून मैदानातील महत्वाचे साहित्य, कुलूप तोडून चोरी केली. एकशिंगे यांना दगड आणि लाठीने मारून हातपाय तोडून जीवे मारण्याची व मुळशी पॅटर्न प्रमाणे विषय संपवून टाकण्याची धमकी दिली. मैदानातील सामानाची चोरी करून एकशिंगे यांचे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.