Mr.एकबोट्या, दादांबद्दल नीट भाषा वापरायची…

0
6

दि.१३(पीसीबी)-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरक्षकासंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांवर गोरक्षकांचे नेतृत्व करणारे मिलिंद एकबोटे यांनी आक्षेप घेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कायदेशीर परवानगी असलेल्या पशुधन वाहतुकीदरम्यान वाहनचालकांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांवर अंकुश ठेवावा आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी अशा वाहनांची तपासणी करणाऱ्या खासगी व्यक्तींवर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. मात्र, मिलिंद एकबोटे यांनी अजित पवारांवर टीका केली. त्यांच्या या टीकेचा ठोंबरे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये त्यांच्या खास शैलीत मिलिंद एकबोटे यांना उत्तर दिले आहे. ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट काय?

मा.अजित दादांची लाज काढणारे Mr.एकबोट्या तुमच्या घरी गाय नसेलच म्हणा , ये आपल्या दादांच्या गोठ्यात जाऊन ये बाबा, त्या गाईच शेणमुत काढून तुमची पूर्वीची पाप तरी धुतल्या जातील रे. आणि दया सोडून मी नाही त्यातला कढी लाव आतली भाषा. अजितदादा बद्दल भाषा नीट,म्हणजे नीटच वापरायची. कायद्यात राहताल तर फायद्यात राहताल बरे. दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार नसानसात भिनवा पहिले.सोईचे विचार चालत नाही, भुरट्या लोकांना कडेलोट किंवा हत्तीच्या पायाखाली देत होते,छत्रपती महाराज.

अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कसाई यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर अजित पवार यांनी कसाई आणि शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असं सांगितलं.

हे कसाई गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या देशातील पशुधन संपवायला निघाले आहेत. पशुधन संपल्यामुळे भेसळयुक्त दूध लोकांना प्यायला लागत असून संस्कृतीलाही धक्का बसत आहेत. या सर्व गोष्टींचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काहीच वाटत नाही. याबाबत मला खेद वाटत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कसाई यांची बैठक घेतली, त्याच पद्धतीने गोरक्षकांचीही बैठक घ्या, अशी मागणी केली आहे. तसेच, पवारांना जनाची नाही, तर मनाची तरी आहे की नाही?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकसभेला पवारांना एकच जागा मिळाली. पण, मोदींच्या आशीर्वादाने त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाले आहे, याची जाणीव पवारांनी ठेवावी. असेही बोटे यावेळी म्हणाले.

राज्यभरात भाकड म्हशीची खरेदी विक्री करणाऱ्या कुरेशी समाजाला गोरक्षकांकडून त्रास दिला जात आहे, असा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आला होता. त्यासाठी नुकतेच राज्यभरात कुरेशी समाजाकडून मूकमोर्चा देखील काढण्यात आला. म्हशींच्या खरेदी-विक्री करता वाहतुकीदरम्यान गोरक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या विरोधात हे मोर्चे काढण्यात आले होते.

कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत आपल्या अडचणी सांगितल्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी कायदेशीररित्या परवानगी असलेल्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना त्रास देणाऱ्या गोरक्षकांना आवर घाला. तसेच, जिल्हा पोलिस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणाऱ्या खासगी व्यक्तींना रोखावं, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.