“महागाई – बेरोजगारी विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनता विजयी करेल” – कैलास कदम

0
438

चिंचवड दि. ८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2023 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारामध्ये काँग्रेस सक्रियपणे सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या रॅलीमध्ये सुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम हे सक्रियपणे प्रचारात सहभागी झाले.

आज प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी शहर काँग्रेसने आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नाना काटे यांना जाहीर पाठिंबा देत आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या प्रभागांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी सज्ज केले आहे. या बैठकीद्वारे कोकण रत्न विकास महासंघ, विविध महिला बचत गट, युवक संघटना, विविध समाजाच्या संघटना, परिसरनिहाय कार्यकर्त्यांचा संच यांनी आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना पुष्पगुच्छ देत आपला पाठिंबा जाहीर केला.

थेरगाव येथील एका हॉटेलवर पार पडलेल्या या काँग्रेस प्राधिकार्‍यांच्या बैठकीस मावळ मतदार संघाचे आमदार सुनील शेळके महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव गौतम आरकडे, प्रदेश महिला काँग्रेसचे सरचिटणीस शोभा पगारे आदी व इतरही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी चिंचवड मतदार संघाच्या वेगवेगळ्या भागातील कार्यकर्ते सर्व एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, जनसामान्यांना महाविकास आघाडीचे उमेदवारास मतदान करण्यासाठी आवाहन करून, भेटीगाठी करून, निश्चितपणे विजय मिळवणार आहोत अशा भावना या ठिकाणी व्यक्त केल्या.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले, “काँग्रेस माझा जुना परिवार आहे या बैठकीत मला माझ्या स्वगृही परतल्याचा आनंद होत आहे आगामी काळातील केंद्रातील सरकारने निर्माण केलेली आव्हाने पाहता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे भाजप सरकारने जी खोटी आश्वासने दिली त्याच्या विरोधात उत्तर देण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना अधिकाधिक प्रमाणामध्ये संपर्क करावा”.

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले “महानगरपालिकेच्या तील भ्रष्टाचाराने शहरातील लाखो लोकांची मान शरमेणी खाली जाईल, असे वर्तन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये घडलेली आहे. देशात कामगार चळवळ मोडीत काढण्यासाठी अन्ययकारक, कामगार कायदे करण्यात आले आहेत, शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आदानी सारख्या उद्योजकांचा भरणा करून नागरिकांचे पैशाची लूट केली जात आहे, या सर्वांवर उत्तर देण्यासाठी चिंचवड मतदार संघाच्या माध्यमातून हा उमेदवार विजयी करून दाखवू” असा निश्चय कदम यांनी व्यक्त केला.

आमदार सुनील शेळके म्हणाले केंद्रातील आणि राज्यातील एकंदरीतच नागरिकांची दुरावस्था या भाजप सरकार मुळे झालेली आहे आणि सहानुभूती च्या नावाने मत मागणारे पुण्यामध्ये काय भूमिका घेतली यावरून नागरिकांना भाजपचे टप्पे 50 स्पष्ट होत आहे पुण्यात निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवार जिंकेल आणि या ठिकाणी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचे माध्यमातून जिंकेल आणि नुकतेच विधानपरिषद निवडणुकांचे माध्यमातून झालेले परिवर्तन या निवडणुकांमध्ये देखील यशस्वीपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाविकासाकडे जो उमेदवार नाना काटे म्हणाले, “माझ्या कार्याची पावती पिंपळे सौदागर चा विकास देतो आहे, मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली संधी आपल्या सर्वांच्या मदतीने या शहरातील भाजपची व्यवस्था बदलवून टाकण्यासाठी, या निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी आपण सर्व मायबाप जनतेने मला आशीर्वाद द्यावा, आणि निश्चितपणे विकासाचे एक नवे पर्व हे चिंचवड मतदार संघात मी आपल्या सर्वांचे विश्वासावर घडवून दाखवेन, असे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रदेश काँग्रेस सचिव दीपक साईसर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल,शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दही तुले, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, चिंचवड मतदार संघ काँग्रेसचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, स्वप्निल बनसोडे, रवी नांगरे, निखिल भोईर, सचिन कोंढरे, मिलिंद बनसोडे, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, रोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरवदे, ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष झेवियर एंथनी, इस्माईल संगम, जुबेर खान, डॉ. मनीषा ताई गरुड, प्रियंका मलशेट्टी, निर्मलाताई खैरे, भारतीताई घाग, नंदाताई तुळसे, महानंदा कसबे, संदीप शिंदे, श्याम भोसले, राजू ठोकळे, अबूबकर लांडगे, तानाजी काटे, पांडुरंग जगताप, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, आण्णा पुरंदरे, इरफान शेख, फिरोज शेख आधी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.