ते हे माय ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण व शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ फुगेवाडी गावठाण तर्फे फुगेवाडी येथील शिवतीर्थावर श्रीमान योगी कादंबरी वाचन सोहळ्याचे आयोजन

0
353
Exif_JPEG_420

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – फुगेवाडी गावातील ते हे माय ज्ञानेश्वरी प्रतिष्ठाण व शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळ हे सतत समाजप्रती जागृती करण्यासाठी छोटे ऊपक्रम राबवतात, किल्लोत्सव स्पर्धा, शिववंदाना प्रचार प्रसार,ज्ञानेश्वरी ओवीं व अभंग प्रसार,विविध विषयावर आधारित प्रश्न मंजुषा अशे अनेक ऊपक्रम या परिवाराने राबवले,तसेच परिवारा तर्फ दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना गेली नऊ वर्ष झाले अजुही घेतली जाते.अशातच दोन्ही परिवारांनी मिळुन नविन ऊपक्रम यंदाही हाती घेतला.ऊपक्रमाचा विषय रणजित देसाई लिखित श्रीमान योगी कादंबरी महावाचन सोहळा असा आहे.

फुगेवाडी गावात मागील वर्षी शिवतीर्थ लोकार्पण सोहळा पार पडला,मोठ्या थाटात हा सोहळा झाला,फुगेवाडी गावाला या शिवतीर्था मुळे एक वैभव प्राप्त झाले होतो.शिवतीर्थाला झालेली वर्षपुर्ती,आईसाहेब जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज जयंती याच प्रमाणे शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळाला पुर्ण होणारी नववी वर्षपुर्तीं साजरी करण्यासाठी तसेच शिवतीर्थाच पावित्र सात्यत्याने राखण्यासाठी या ऊपक्रमाच आयोजन केल.विशेष म्हणजे या ऊपक्रमाच आयोजन कर्ते ही सर्व लहान मुले छत्रपतींच्या कर्तव्यांच अभ्यास व्हावा व गोडी लागावी यासाठी कादंबरीची रोज तेरा पान सायंकाळी पाऊण तास शिवतीर्थावर वाचन करतात.यामध्ये शिवराज पेठे,आरव गडेकर,प्रसाद घुमे,शंभुराज सातपुते,मयुरेश धोत्रे,व सार्थक पवार ईत्यादी लहान मुलांनी सहभाग घेतला आहे.आठ जानेवारीला कांदंबरीचे विधिव्रत पुजन करुन या वाचन सोहळ्या आरंभ झाला तसेच नऊ एप्रिल म्हणजे परिवाराच्या नवव्या वर्धापन दिना दिवशी या वाचन सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.यासाठी वाचन सोहळ्यासाठी सढळ हताने मदत करावी असेही शिववंदना धर्म जागृती सेवा मंडळाच्या वतिने अवाहन करण्यात आले आहे.