कसब्यात भाजप उमेदवार बदलण्याच्या मूडमध्ये – बावनकुळे

0
303

पुणे, दि. ६ (पीसीबी) – कसब्यात ब्राम्हण समाजाला भाजपने उमेदवारीत डावलल्याने मोठी खळबळ आहे. आयत्यावेळी उेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वेळ आहे उमेदवार बदलता येईल, असं खळबळजनक विधान बावनकुळे यांनी केलं आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात पुण्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. वेळ आहे उमेदवार बदलता येईल, असं खळबळजनक विधान बावनकुळे यांनी केलं आहे.

मुक्ताताई असत्या तर प्रश्नच नव्हता, कोणी कोणाला डावलत नाहीये ब्राह्मणांनी तर पक्षासाठी आयुष्य दिलंय. पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिलाय आणि समाजानेही खूप काही दिलंय. आजही त्यांनी चिंचवड आणि कसब्याला पाठिंबा दिला तर आम्ही तसा विचार करु बापट यांची प्रकृतीदेखील चांगली नाही. त्यामुळे भाजप कुणावर अन्याय करत नाही. महाविकासआघाडीने एक पाऊल मागे घेतले तर दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध करायला तयार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना आजही विनंती करतोय की ही निवडणुक बिनविरोध व्हावी. असही बावनकुळे यावेळी म्हणाले.