IIM साठी मोशीच्या माळावर ७० एकर जागा

0
2

दि. २९(पीसीबी)- पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. मोशीमध्ये तब्बल 70 एकर जागेवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी परिसरात या आयआयएम कॅम्पससाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. १६ एकरावर न्यायालय, ४० एकरावर अभियांत्रिकी महाविद्यालय, २०० एकरवर आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, १०० एकरवर सुविधा केंद्र, तब्बल ८०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, जगातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आदी प्रकल्पांमुळे मोशीचा माळरान फुलणार आहे. आता त्यात IIM ची भर पडली आहे.

सध्या देशभरात एकूण 21 भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) कार्यरत आहेत. यामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे मुंबई आणि नागपूर येथे आयआयएमच्या शाखा आहेत. आता या यादीत आणखी भर घालत पिंपरी-चिंचवडमध्येही आयआयएमची नवी शाखा सुरू होणार आहे. आयआयएम नागपूरच्या या शाखेसाठी गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि अखेर त्याला यश

आयआयएम म्हणजे काय?
भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) या देशातील सर्वोच्च व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. येथे एमबीए आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासोबतच संशोधन, उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला चालना दिली जाते. जागतिक स्तरावर सक्षम व्यवस्थापक आणि उद्योगनेते घडवणे हेच या संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट मानले जाते.