आळंदी एमआयटीत भारत नकाशाची मानवी साखळी

0
401

प्रजासत्ताक दिनी लक्षवेधी उपक्रम

आळंदी, दि.२८ (पीसीबी): येथील एमआयटी ज्युनियर काॅलेज मधील विद्यार्थांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पूर्व संध्येला काॅलेजमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक सर्वानी एकत्र येऊन भारताच्या नकाशाची मानवी साखळी तयार करून लक्षवेधी मानवी साखळी साकारली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी भारताच्या झेंड्याच्या रंगा प्रमाणे आपापले कपडे परिधान करून मानवी साखळीने भारताच्या नकाशाला मूर्त रूप देण्यात आले.

हा नकाशा. १०० बाय ४० फुट आकाराचा लक्षवेधी होता. या मानवी साखळीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेर्‍याद्वारे करण्यात आले. यावेळी भारतीय प्रजासत्ताक दिनी सविधानाला एमआयटी ज्युनियर कॉलेजच्यआ वतीने मानवंदना देण्यात आली. या उपक्रमाचे स्वागत विश्वस्त प्रा. स्वाती कराड ( चाटे ) यांनी केले. उपक्रमाचे प्राचार्य डाॅ. सदाशिव कुंभार, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी, माजी विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात या मानवी साखळीत सहभाग घेतला.