दादा मी चुकले ! गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी, आता मी माझ्यात बदल केला आहे

0
209

पंढरपूर, दि. १३ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावातील कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिलं निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील गौतमीला बोलावण्याचे प्रकार केले, त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली होती. त्यानंतर आता गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ समोर आला.

‘पूर्वी मी चुकले होते आणि त्यासाठी वारंवार माफी देखील मागितली, आता मी माझ्या नृत्यशैलीमध्ये, वेशभूषेमध्ये बदल केला आहे. अजितदादा खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. दादा मी चुकले पण आता मी माफी मागत आहे, असं म्हणत गौतमी पाटीलने माफी मागितली. तसंच प्रेक्षकांनी देखील माझे जुने व्हिडिओ काढून मला ट्रोल करू नये, मी जे चांगलं केलं त्यावर देखील लोकांनी बोलावं, अशी विनंती देखील गौतमी पाटीलने यावेळी केली.

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात अश्लिल पद्धतीने डान्सचे कार्यक्रम केले जात आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अश्लिलपणा आणणारा प्रकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, लावणी असेल पण लावण्याच्या नावाखाली अश्लिलता होता कामा नये. काही जिल्ह्यात बंदी आहे. याची सविस्तर माहिती घेणार. संस्कृती, परंपरा ही टिकली पाहिजे. त्याला कुणी चुकीचा पायंडा पाडत असेल, तर यावर मी अधिवेशनात तो मुद्दा मांडणार असल्याचे अजित पवार म्हणाले होते. तसेच या अशा कार्यक्रम ठेवण्याची सध्या स्पर्धाच रंगत आहे. अशा या कार्यक्रमांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसच बोर्ड असतो. हे योग्य नाही. आम्ही जिल्हाप्रमुख आणि पदअधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात येणार’ अशी तंबी देखील ]अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली होती.