शस्त्राच्या धाकाने मोबाईल हिसकावला

0
203

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – गळ्याला सत्तूर लावून तरुणाचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. १०) पहाटे साडेचार वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला.

रमजान रज्जाक शेख (वय २३, रा. भोसरी एमआयडीसी. मूळ रा. सोलापूर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे पायी चालत घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. शेख यांच्या गळ्याला सत्तूर लावून दमदाटी करत दोघांनी शेख यांचा २० हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.