GPAT 2023 या परीक्षेत रसिकलाल एम धारिवाल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्चच्या विद्यार्थिनींनचे घवघवीत यश

0
528

चिंचवड,दि.०३(पीसीबी) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित, रसिकलाल एम धारिवाल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च, चिंचवड या विभागातील विद्यार्थिनीने राष्ट्रस्तरीय GPAT 2023 या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कु. अक्षिता प्रमोद जैन हिने राष्ट्रस्तरीय GPAT 2023 या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

सदर परीक्षेस अंदाजे ६२२७५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यात कु. अक्षिता प्रमोद जैन हिने राष्ट्रस्तरावर ९९.६६ GPAT स्कोअर मिळवून २०९ वा क्रमांक मिळवून संस्थेचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.

महाविद्यालयातील एकूण आठ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेत. कु मानसी जाधव (९८.३०), चि. सुजित एरंडोले (९७.९१), चि. गौरव सोनावणे (९६.०९), चि. प्रसाद शिंदे (९५.६९), कु. चैत्राली रुनवाल (९५. ४४), कु. प्रतीक्षा दवकारे (९१.८१), कु. चैत्राली थत्ते (९०.३८).

श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाशचंदजी रसिकलालजी धारिवाल, चेअरमन मा. श्री शांतिलालजी लुंकड, ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. श्री. ॲड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय वालोदे यांनी विद्यार्थ्यांना अनेक शुभेच्छा दिल्या व विशेष कौतुक केले.

महाविद्यालयाच्या GPAT परीक्षा समन्वयक सहायक प्राध्यपिका डॉ. प्रियांका छाजेड व सौ. ज्योती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षाविषयक मार्गदर्शन केले.
सदर विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.