Google एका सेकंदाला किती कमावतो?

0
353

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – आज गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झालाय. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही बसून तुम्ही गुगलच्या माध्यमातून हवी ती माहिती घेऊ शकता. गुगलने माणसाचं जीवन सुसह्य केलंय पण तुम्हाला माहिती आहे का? गुगल एका सेकंदात किती कमावतो? तुम्हाला ऐकून धक्का बसेल.

गुगल हे सर्वात जुने असलेल्या सर्च इंजिन पैकी आहे. हे सर्च इंजिन आधी “बेकरब” या नावाने ओळखले जायचे. त्यानंतर 1996 पासून त्याला Google या नावाने ओळखले जाऊ लागले. आज गुगलहे जगातील सर्वात मोठं आणि पहिल्या क्रमांकाचं सर्च इंजिन आहे.

जगभरात एकाच वेळी लाखो लोक गुगलवर काही ना काही सर्च करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की गुगल एका सेंकदात किती कमावतो? गुगलची एका सेकंदाची कमाई सुमारे $807 आहे म्हणजेच भारतीय चलनांनुसार ही किंमत 59 हजार 607 रुपये आहे. म्हणजेच Google एका मिनिटाला 35 लाख 76 हजार 420 रुपये कमाई करतो.

येत्या काळात गुगलने बरीच प्रगती केली आहे. यूट्यूब, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम, गुगल मॅप, जी मेल, गुगल म्युझिक आणि व्हिडिओ प्लेअर, गुगल पे, डिजिटल वेलबिंग आणि कॅलक्युलेटर इत्यादी. यामुळे दैनंदिन जीवनात गुगलचे महत्त्व आणखी वाढले.